कोरडे व अर्ध-कोरडे पानझडी जंगल, डोंगराळ व सपाट प्रदेश.
भारत, श्रीलंका, म्यानमार व आग्नेय आशिया. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू येथे नैसर्गिकरित्या आढळतो.
हा मध्यम आकाराचा सदाहरित वृक्ष असून 12–18 मीटर उंच वाढतो. पाने अंडाकृती, फुले लहान हिरवट-पांढरी असतात. फळ गोलाकार असून त्यामध्ये 2–5 चपट्या बिया असतात.
कजऱ्याच्या बियांमध्ये Strychnine व Brucine हे घातक द्रव्ये असतात. आयुर्वेदात वापरण्यापूर्वी दूध, तूप किंवा इतर माध्यमांतून शोधन करणे अत्यावश्यक आहे. वैद्यांच्या सल्ल्याशिवाय वापर प्राणघातक ठरू शकतो.
काही आदिवासी समाजात योग्य प्रक्रिया करून कजरा औषध म्हणून वापरला जातो.
कजरा (Strychnos nux-vomica) रोपे सिद्धनाथ नर्सरी, अनवली येथे मर्यादित प्रमाणात उपलब्ध.